आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये भाजपच्या पराभवाने राज्यातील चाैघांचे मंत्रिपद वाचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बिहारमधील पराभवाने भाजपमध्ये नैराश्याची भावना पसरली असली तरी राज्यातील त्यांच्याच चार मंत्र्यांच्या मात्र हा निकाल पथ्यावर पडलेला दिसताे. वर्षभरात कामगिरीत फारसा प्रभाव न पाडू शकलेल्या या मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. मात्र बिहारच्या निकालानंतर पक्षश्रेष्ठी बॅकफुटवर गेल्याने त्यांनी राज्यातील नेत्यांना न दुखावण्याच्या सूचना फडणवीस यांना दिल्या अाहेत. त्यामुळे तीन कॅबिनेट व एका राज्यमंत्र्यांचा ‘लाल दिवा’ विझता विझता वाचला, अशी माहिती भाजपमधीलच विश्वसनीय सूत्रांनी दिली.
महिनाअखेरीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हाेणार अाहे. त्यात एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासारख्या ज्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे चारपेक्षा जास्त खाती अाहेत त्यांची काही खाती इतर मंत्र्यांकडे सुपूर्द करण्याबाबतही विचार सुरू अाहे. तसेच काही जणांकडील खात्यांची अदलाबदलही केली जाऊ शकते. गृह राज्यमंत्री राम शिंदे यांना कॅबिनेटपदी बढती मिळण्याची शक्यता अाहे.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराविषयी फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून िवस्तारातील नावे जवळपास िनश्चित झाली आहेत. िशवसेनेला दोन, तर घटक पक्षांना तीन, तर भाजपच्या पाच अामदारांना िवस्तारात संधी िमळेल. िशवसेनेला एक कॅबिनेट, तर एक राज्यमंत्रिपद िमळेल, अशी चर्चा असून रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत तर िरपाइंच्या वाट्याला एक मंत्रिपद येणार आहे. मात्र रिपाइंकडून काेणाची लाॅटरी लागणार याबाबत अजून नाव निश्चित झालेले नाही. अाठवले यांच्या पत्नी सीमा यांचे नाव अाघाडीवर अाहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचे नावही राज्यमंत्रिपदासाठी घेतले जाते. मात्र त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी स्मारकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी असल्याने त्यांच्या नावाबाबत अद्याप अंतिम निश्चिती झाली नसल्याचीही चर्चा अाहे. भाजपकडून पांडुरंग फुंडकर, संजय कुटे, मदन येरावार, जयकुमार रावल, सुरेश खाडे, संभाजी पाटील निलंगेकर, राज पुराेहित यांच्या नावांची चर्चा आहे.