आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Drugs Smuggler And Police Issue At Mumbai.

विदेशी ड्रग्ज तस्करांची पोलिसांवर दगडफेक; 22 पळाले, दोघांना पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विदेशी ड्रग्ज तस्करांनी दगडफेक करत सात पोलिसांना जखमी केल्याची घटना वाडी बंदर येथे शुक्रवारी घडली. या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करत दोघांना अटक केली. मात्र, त्यांचे इतर २२ साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

इनफुनाया मिंके आणि इक्ये इमनियाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून अडीच लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. वाडी बंदर येथे काही विदेशी तस्कर ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वाडी बंदर परिसरातील मोकळ्या रेल्वे रुळांजवळ तस्कर थांबले होते.

या वेळी आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र,आरोपींनी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात सात पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी हवेत गोळीबार केला. यात दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, अंधाराचा फायदा घेत सुमारे २२ तस्कर पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाडी बंदर येथील कारवाईत पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले. दोघांची चौकशी केली असता त्यांच्यासोबत आणखी २२ जण होते, अशी माहिती त्यांनी दिली.

एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या तस्करांमुळे पोलिसही चक्रावून गेले होते. त्यांच्याकडे किती ड्रग्ज होते याचा पोलिस शोध घेत आहेत. यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.