आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Foreign Languages For Workers Child, State Governments New Scheme

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामगारांच्या मुलांना परदेशी भाषेचे शिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील कामगारांच्या मुलांसाठी राज्य सरकारने अभिनव योजना आखली आहे. कामगारांच्या मुलांना परदेशी भाषांचे ज्ञान मिळावे, यासाठी सरकार लवकरच इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, जपानीसह चिनी भाषेचे ज्ञान देणारी प्रशिक्षण केंद्रे राज्यात सुरू करणार आहे. कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले, कामगारांच्या मुलांसाठी परदेशी भाषेची केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

सुरुवातीला राज्यातील कामगार कल्याण कार्यालयात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येतील. केंद्रात मुलांना इंग्रजीसह इतर परदेशी भाषा शिकवण्यात येतील. कामगारांच्या मुलांना शिकवून रोजगार मिळवून देणे हा योजनेमागील उद्देश आहे. या योजनेत शिक्षण घेणाºया मुलांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.