आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी छायाचित्रकाराने दाखवले पुणे ते पुष्कर, मुंबई ते दिल्लीपर्यंतच्या भारतीय महिलांचे सौदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या एका रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहणारी महिला. - Divya Marathi
मुंबईच्या एका रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहणारी महिला.
मुंबई/पुणे- आज जागतिक छायाचित्र दिन यानिमित्त जगभरातील फोटोग्राफर्संना सलाम करण्याचा दिवस आहे. आज आम्ही आपणाला रोमानियाच्या एका महिला फोटोग्राफर माएला नोरोस यांनी 'इंडियन ब्यूटी' थीमवर काढलेली काही छायाचित्रे दाखवणार आहोत. यामध्ये पुण्यापासून पुष्करपर्यंत आणि मुंबईहून दिल्लीतील वस्त्यांमधील बॉलीवुडमधील नैसर्गिक सौदर्याचा समावेश आहे. 

फोटो सीरिजमध्ये हे आहे खास...
माएला नोरोसने या छायाचित्रांमध्ये महिलांचे नैसर्गिक सौदर्य टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
- झोपडपट्टीत राहणारी महिला ते बॉलीवूड अभिनेत्री सर्वांचेच सौदर्य दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.
- मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली, पुष्कर, अमृतसर आणि वाराणसी या ठिकाणी ही छायाचित्रे टिपण्यात आली आहेत.
- नोरोसच्या म्हणण्यानूसार भारतीय महिलांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. शक्ती आणि सौदर्याच्या त्या प्रतिक आहेत.
- आपल्या स्वप्नपुर्तीसाठी महिला खूप मेहनत करतात. मी अशा महिलांना समोर घेऊन आले आहे. ज्या आपल्या स्वप्नांवर प्रेम करतात.
- भारतीय महिलांच्या अंतर्गत आणि बाह्य सौदर्याला टिपण्याचा प्रयत्न आपण छायाचित्रांमधुन केला आहे.
 
कोण आहेत माएला नोरोस
- रोमानियाच्या बुखारेस्ट येथे राहणाऱ्या 30 वर्षीय माएला नोरोस या पर्यटन करणाऱ्या फोटोग्राफर आहेत.
- नोरोस या मागील 3 वर्षांपासून जगाच्या वेगवेगळ्या देशात पर्यटन करत आहेत.
- त्या वयाच्या 17 व्या वर्षापासून फोटोग्राफी करत आहेत. माएला यांचे वडील एक पेंटर होते.
- आपल्या छायाचित्रांच्या आवडीसाठी तिने वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे.
- एक पर्यटन म्हणुन फिरताना जगभरात आणि भारतातील विविधतेचे दर्शन माएलाला घडले.
- 27 व्या वर्षी माएलाला वाटले की आपण सर्वसामान्य जीवन जगण्यापेक्षा पर्यटक आणि छायाचित्रकार म्हणुन जगाची सफर करावी.
 
पुढील स्लाईडवर पाहा माएला नोरोसने टिपलेले भारतीय महिलांचे सौदर्य दाखवणारे फोटो
 
बातम्या आणखी आहेत...