आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट: पानसरे दांपत्यावर 2 पिस्तुलांतून झाडल्या 5 गोळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ कोल्हापूर- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडाशी संबंधित एक खुलासा झाला आहे. पानसरे व त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दोन पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या होत्या. ही माहिती फॉरेन्सिक लॅबद्वारे केलेल्या चौकशी पुढे आली आहे. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.
घटनास्थळावर पोलिसांना मिळालेल्या गोळ्यांच्या पुंगळींचे विविध तुकडे कोल्हापूर पोलिसांनी मुंबईस्थित फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते. सुमारे महिन्याभरानंतर या लॅबचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.
या संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे दांपत्यांवर दोन पिस्तुलामधून पाच गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. घटनास्थळावर ज्या पुंगळ्या मिळाल्या आहेत त्यावरून समजते की किती गोळ्या झाडल्या आहेत व कोणत्या प्रकारच्या पिस्तुलातून या गोळ्या झाडल्या आहेत. या अहवालामुळे पोलिसांना पिस्तुलाच्या साईजमुळे तपास कामात मदत होऊ शकते. त्यामुळे हो रिपोर्ट महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या महिन्यात 16 फेब्रुवारीला कोल्हापूरात पानसरे दांपत्यांवर दोन अज्ञात बाईकस्वरांनी जवळून गोळ्या घातल्या होत्या. यात गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांच्या पत्नी उमा या हल्ल्यातून बालंबाल वाचल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...