आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन खात्याचेही आता काॅल सेंटर; देशातील पहिलाच प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अनधिकृत वृक्षतोडीमुळे होणारा वनसंपत्तीचा ऱ्हास राेखण्यासाठी वन विभागातर्फे लवकरच:चे काॅल सेंटर सुरू करण्यात येणार अाहे. मानवी वसाहतीत वाघाने घुसखाेरी केल्यास या सेंटरशी संपर्क साधून मदतही मिळवणे शक्य हाेणार अाहे. देशातील पहिले काॅल सेंटर मुंबईत होणार असून त्याचा क्रमांक १८००२२५३६४ असा असेल.

वन्यजीव, जैवविविधता, पर्यावरण, िनसर्ग संवर्धनाबराेबरच त्याचा विकास अाणि व्यवस्थापन कसे करावे यावर नागरिकांकडून तक्रारी अाल्या. त्यांची साेडवणूक करण्याबराेबरच सूचनांचे शंका समाधान करण्याच्या दृष्टीने काॅल सेंटरचा िनर्णय घेण्यात अाला अाहे. देशातील अशा प्रकारचे पहिलेच काॅल सेंटर असल्याचे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांिगतले.
मुंबईच्या उपनगरात हे केंद्र उभारण्यात येणार अाहे. या काॅल सेंटरचे काम तीन पाळ्यांत सुरू राहणार असून प्रत्येक पाळीत दाेन ते तीन व्यक्ती कार्यरत असतील. काॅल कसा घ्यावा अडचणी कशा साेडवाव्यात याचे प्रशिक्षण या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांिगतले.
बेकायदेशीर वृक्षताेड िकंवा जंगलसंपत्तीचा नाश करताना काेणी नजरेस अाल्यास १८००२२५३६४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. त्यानंतर काॅल सेंटरमधून त्या भागातील संबंधित व्यक्तीला माहिती देण्यात येईल. मानवी वसाहतीत वाघ घुसण्याचे प्रकार अनेकदा घडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरते. पण अाता त्याची माहितीदेखील तातडीने या काॅल सेंटरच्या क्रमांकावर कळवता येणार अाहे.

एसएमएस सेवाही सुरू करणार
सरकारने यंदा दाेन काेटी झाडांची लागवड केली. पुढील तीन वर्षांत ५० काेटी झाडे लावण्याचा मानस अाहे. या उपक्रमात स्वयंसेवी संस्था, उद्याेजक, काॅर्पाेरेट, एनसीसी एनएससचे विद्यार्थी, नागरिक माेठ्या संख्येने सहभागी होतील. उपक्रमाचे सुनियाेजित व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनेही काॅल सेंटर महत्त्वाचे ठरणार अाहे. या उपक्रमात सहभागी हाेणाऱ्यांच्या अडचणी या माध्यमातून साेडवण्यात येतील.या प्रयाेगाला यश िमळाल्यानंतर एसएमएस सुविधादेखील सुरू करण्याचा िवचार असल्याचे अधिकाऱ्याने सांिगतले.
बातम्या आणखी आहेत...