आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी, स्वराज यांची पाठराखण करणाऱ्या पवारांची एसआयटी चौकशी करा : काँग्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अायपीएल प्रकरणासंदर्भात ललित मोदी सुषमा स्वराज यांची पाठराखण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसकडून गुरुवारी करण्यात आली. याविषयी काँग्रेसचे प्रवक्ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.

आयपीएलमध्ये प्रचंड घोटाळे करून ललित मोदी लंडनला पसार झाले. पण आयपीएलच्या माध्यमातून मोदींना मोठे कोणी केले, हे साऱ्या जगाला माहीत आहे. ललित मोदींना लंडनला जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप स्वराज यांच्याबरोबर वसुंधरा राजे तसेच राजेंचा मुलगा दुष्यंत सिंग यांच्यावर झाला आहे. हे आरोप होत असताना पवार मात्र ललित मोदींसह या सर्वांना वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. हे सारे संशयास्पद असल्याने पवारांची चौकशी होण्याची गरज आहे, असे निरुपम म्हणाले.

आयपीएल प्रकरणात पवारांचेही हितसंबंध गुंतले असल्याने ते आता यासंदर्भात पाठराखण करण्याची भूमिका घेत आहेत, असे निरुपम यांनी स्पष्ट केले. पण आयपीएलसंदर्भात राजीव शुक्लसारखे काँग्रेसचेही काही नेते आहेत. त्यांच्याही चौकशीची तुम्ही मागणी करणार का ? असे िवचारले असता निरुपम म्हणाले, आयपीएल घोटाळा प्रकरणातील सर्वांचीच चौकशी व्हायला हवी. मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी चालेल. शरद पवार यांना आयपीएल घोटाळ्याच्या व्याप्तीची चांगली माहिती असणार म्हणूनच ते आता ललित तसेच स्वराज यांची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे निरुपम म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...