आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Formar PWD Minister Chagan Bhujbal Special Reports

‘एसीबी’चा फास : छगन भुजबळांवर आणखी दोन गुन्हे दाखल हाेणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेहिशेबी मालमत्ता, मुंबईतील भूखंड महाराष्ट्र सदनप्रकरणी दाेन गुन्हे दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी अाणखी वाढण्याची चिन्हे अाहेत. येत्या तीन-चार दिवसांत त्यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यांबद्दल चार गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची तलवारही टांगती राहणार आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आणखी काही महत्त्वाच्या जागा ‘बीओटी’ तत्त्वावर देण्याच्या भुजबळांच्या िनर्णयाची सध्या जोरात चौकशी सुरू असून त्या प्रकरणीच हे दोन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यातील दोन भूखंड नवी मुंबईतील हेक्सवर्ल्ड आणि चेंबूरमधील दीक्षागृह यांना नियमबाह्यरीत्या देण्यात आले. या प्रकरणी भुजबळांवर गुन्हे दाखल होतील, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र सदन तसेच सार्वजनिक बांधकाम प्रकरणात अनेक कामांमध्ये अनियमितता असल्याचे ‘एसीबी’च्या चौकशीत स्पष्ट झाले असून ही कामे देण्याचा िनर्णय हा भुजबळांचा होता. आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांनी ही कामे केली असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केल्याचे एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
भुजबळांनी महाराष्ट्र सदन तसेच अंधेरीचे आरटीओ कार्यालयातील िवकास प्रकल्प मंजूर करताना पदाचा गैरवापर केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतरच त्यांच्याविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले अाहे.
मालमत्तेबाबत उत्तरे नाहीत-

इतकीमालमत्ता कशी जमवली, याबाबत चाैकशीत भुजबळ समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. तसेच अंधेरीच्या आरटीओ कार्यालयाचा प्रकल्प अहवाल तसेच स्टेटस िरपोर्ट तयार करताना बनावट ताळेबंद तयार करण्यात आले होते. हे माहिती असूनही ते समितीसमाेर मांडण्यात आले, असे एसीबीच्या तपासात पुढे अाले हाेतेे. त्यामुळेच भुजबळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ‘एसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. भुजबळांनी मात्र या अाराेपांचे खंडन केले अाहे. भूखंड देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमिती, मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने घेतला हाेता, त्यामुळे ही सामूहिक जबाबदारी अाहे असे स्पष्टीकरण ते देतात.

घाेटाळे उघड : सोमय्या-
भुजबळांच्या घाेटाळ्यांची संख्या व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक असे एफआरआय भुजबळांवर दाखल हाेतील. हे राजकीय षड‌्यंत्र असल्याचे भुजबळ आता सांगत असले तरी त्यांनी िदलेल्या कामांमध्ये अनियमितता असल्याचे स्पष्ट िदसत आहे. चौकशी करूनच एसीबीने गुन्हे दाखल करण्याचे िनर्णय घेतले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार भुजबळांवर घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या िकरीट सोमय्या यांनी केली.
सूडबुद्धीने निर्णय : भुजबळ-

माझ्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला त्या वेळीही मी सांिगतले होते की हे राजकीय षड‌्यंत्र आहे. सूडबुद्धीने हे िनर्णय घेतले जात असून त्यास ‘एसीबी’ बळी पडत आहे. पण त्यामुळे मी खचून जाणार नाही. या िनर्णयांिवरोधात मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावेन, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी िदले.

काेणाचा दबाव नाही : एसीबी
भुजबळ कुटुंबीयांच्या िवरोधात लागोपाठ गुन्हे दाखल करण्याचा िनर्णय हा राजकीय दबावाखाली होत असल्याचे म्हणणे साफ चुकीचे आहे. ‘एसीबी’ असे कधीच करणार नाही. न्यायालयाने चौकशीचे आदेश िदल्यानंतरच आम्ही अनियमित कामांची तपासणी केली, माहिती घेतली. समोरच्यांचे म्हणणे एेकून घेतले अाणि त्यानंतरच गुन्हे दाखल केले आहेत. आम्ही कोणाच्याही दबावाखाली नाही, असे ‘एसीबी’च्या एका अधिकाऱ्याने सांिगतले.