आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former Attorney general Goolam Essaji Vahanvati Passes Away

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी अॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांचे मुंबईत निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: गुलाम वहानवटी)
मुंबई- देशाचे माजी अॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी (65) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. भारतातील लॉ ऑफिसरसारख्या प्रमुख पदावर काम केलेले वहानवटी हे पहिले मुस्लिम होत. मनमोहन सिंग यांच्या यूपीए-1 व यूपीए-2 सरकारच्या कार्यकाळात ते देशाचे अॅटर्नी जनरल होते.
मनमोहन सिंग यांनी जून 2009 साली ऍड. वहानवटी यांची पहिल्यांदा ऍटर्नी जनरलपदी नियुक्ती करण्यात आली. 2012 साली त्यांना पुन्हा दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर येताच 27 मे 2014 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वहानवटी यांनी 20 जून 2004 ते 7 जून 2009 यादरम्यान भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले. त्याआधी ते महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरलही होते.
गुलाम वहानवटी हे अत्यंत हुशार आणि आपला संयम ढळू न देणारे ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. समोरच्या वकिलाने कितीही चिथावणीखोर युक्तिवाद केला तरीदेखील वहानवटी हे अगदी शांतपणे त्याला मुद्देसूद उत्तर देत. त्यांच्या या खुबीने त्यांना अनेक खटल्यांमध्ये यश मिळवून दिले. मुंबई हायकोर्टाच्या 150 व्या सोहळ्यानिमित्त बोलताना त्यांनी आपल्या एक साधा वकील ते निष्णात कायदेपंडित म्हणून नावलौकिक मिळवेपर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. प्रख्यात कायदेपंडित जे. सी. भट, अॅड. अशोक सेनसारख्या जायंट वकिलांच्या हाताखाली काम केल्याने मला एवढी झेप घेता आली. एखाद्या प्रकरणात आपल्या अशीलाची प्रभावीपणे बाजू मांडायची असल्यास प्रचंड अभ्यास करावा लागतो. एका प्रकरणात मला रिसर्च करताना सलग १८ तासांचा वेळ लागला होता, असे त्यांनी सांगितले होते.