आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former Cheif Secreatry J.s. Sahariya May New Commissnor Of State Election Commision

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक आयुक्तपदी सहारियांची शिफारस; वीज खंडीतप्रकरणाची ऊर्जा सचिव चौकशी करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी निवृत्त मुख्य सचिव ज. स. सहारिया यांची शिफारस करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर मुंबईतील वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना याची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.
मंगळवारी म्हणजेच कालपासून आतापर्यंत मुंबई, ठाणे व उत्तर मुंबई परिसरातील विविध भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत होऊन मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. वीज जाण्याचा कालावधी प्रत्येक भागात वेगवेगळा होता. या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल. याशिवाय असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना एक आठवड्याच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी सहारियांच्या नावाची शिफारस- राज्य निवडणूक आयुक्त या पदावरील नियुक्तीसाठी निवृत्त मुख्य सचिव ज. स. सहारिया यांची शिफारस करण्याचा निर्णय आज कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. श्रीमती नीला सत्यनारायण यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ 5 जुलै 2014 रोजी संपुष्टात आल्यापासून हे पद रिक्त झाले होते.