आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Chief Minister Shivajirao Nilangekar Clean Chit From Cbi In Aadarsh Scam

'आदर्श'प्रकरणात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकरांना क्लीन चिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांना आदर्श सोसासटी गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयकडून क्लिन चिट देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई हायकोर्टात एक यचिका दाखल केली होती. त्याबाबत सीबीआयने आज हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून निलंगेकर यांच्याविरोधात आमच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले आहे. आदर्श प्रकरणात निलंगेकर यांना आरोपी करावे, अशा मागणीची याचिका वाटेगावकर यांनी दाखल केली होती.

मात्र, आदर्श गैरव्यवहारप्रकरणी निलंगेकर-पाटील यांच्याविरोधात चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा आढळला नाही. तसेच आदर्श सोसायटी उभी करताना विविध स्तरावर परवानगी देताना केल्या गेलेल्या शिफारशी हा गुन्हा मानता येणार नाही. कारण याचा अंतिम निर्णय हे अधिका-यांनीच घेतले असल्याचे म्हणणे सीबीआयने हायकोर्टात सादर केले आहे.