आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Judge, Ex IPS Officer And MNS Leader Join RPI News In Marathi

माजी न्यायाधीश खिल्लारे ‘रिपाइं’त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - माजी न्यायाधीश अशोक डी. खिल्लारे यांच्यासह माजी आयपीएस अधिकारी एस. पी. पाठक, मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष अजीज नवाब शेख आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या निर्मला सरोज यांनी रविवारी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ‘रिपाइं’त प्रवेश केला.

न्या. अशोक खिल्लारे गेली 34 वर्षे विधी आणि न्यायदानाच्या क्षेत्रात कार्यरत होते. नुकतेच ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य न्यायाधिश या पदावरुन निवृत्त झाले आहेत. एस. पी. पाठक माजी आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे वाराणसीचे आहेत.

केंद्रात एनडीएची तर राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे. रिपाइंच्या वाट्यास विधानसभेच्या 35, परिषदेच्या 4 आणि एक मंत्रीपद येईल, अशी अपेक्षा आठवले यांनी यावेळी केली. सातार्‍यात रिपाइंने मराठा समाजाचे संभाजी संकपाळ यांना तिकिट दिले. तेथे उमेदवार बदलण्याचा पक्षाचा कोणताही मानस नसल्याचे ते म्हणाले.