आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former Ncp Mla & Pawar\'s Nearest Manda Mahatre Joins In Bjp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांच्या निकटवर्तीय मंदा म्हात्रे भाजपात, नवी मुंबईत \'नाईकशाही\'मुळे पक्षाला झटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार व शरद पवारांच्या निकटवर्तीय मंदा म्हात्रे यांनी आज सकाळी 11 वाजता भाजपात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे व विनोद तावडे यांच्या उपस्थितीत म्हात्रेंनी प्रवेश करताच भाजपने त्यांचे जोरदार स्वागत केले. गेल्या आठवड्यात त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.
नवी मुंबईतील स्थानिक नेतृत्त्व व बंधू गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करीत म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. मागील पंधरवड्यात म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात जेट्टीच्या उद्घाटन नामफलकावरून वाद झाला होता. तसेच तो पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. म्हात्रे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत असताना त्यांनी केलेल्या कामांचे श्रेय गणेश नाईक घेण्याचा खाटाटोप करीत आहेत असे गंभीर आरोप केले होते. तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे पाठविला होता. म्हात्रे शिवसेनेत जाणार अशी चर्चा असतानाच आज त्यांनी अचानक भाजपात प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मंदा म्हात्रे या शरद पवारांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. पवारांची भगिनी म्हात्रे यांच्या जवळच्या मैत्रिण आहेत. त्यामुळे पक्षस्थापनेपासून मंदा म्हात्रे राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळेच पक्षाने त्यांना पक्ष स्थापन होताच महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद दिले होते. तसेच त्यांना विधान परिषदेतील आमदारकीही दिली होती. आता त्या विधानसभेसाठी तयारी करीत होत्या. मात्र, म्हात्रे यांचे बंधू गणेश नाईक हे ही त्याच विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे या दोघांत पहिली वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे मागील काही दिवसापासून नाईक आणि म्हात्रेंमुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते.
पुढे वाचा, गणेश नाईक-म्हात्रे यांच्या वादाची ठिणगीनंतर काय घडले....