आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Pwd Minister Chagan Bhujbal News In Divya Marathi

पत्र्याच्या चाळीत राहिले, मुंबईत भाजी विकली, आज भुजबळ आहेत अब्जाधिश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनी लॉंडरिंग प्रकरणात अटक झालेले राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी खासदार छगन भुजबळ सध्या तुरुंगात आहेत. भुजबळ कुटुंबीयांकडून 840 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. राजकारणात येण्‍यापूर्वी छगन भुजबळ भाजीपाला विकायचे. भुजबळ यांनी एका वृत्‍तवाहिनीच्‍या कार्यक्रमात या बाबींचा खुलासा केला होता.
अब्जाधीश आहेत भुजबळ
छगन भुजबळ अब्जाधीश असल्याची माहिती वेळोवेळी उघडकीस आली आहे. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. पण राजकारणात आल्यानंतर त्यांनी अब्जावधी रुपयांची माया कमविल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात खुर्चीवर बसून झोप घेताना भुजबळ दिसले होते.
भायखळा येथे विकायचे भाजी
राजकारणात येण्‍यापूर्वी भुजबळ मुंबईच्‍या भायखळा भाजी मंडीमध्‍ये भाजी विकत होते. भुजबळांनी एका वृत्‍तवाहिनीच्‍या कार्यक्रमात सांगितले होते की, "माझे बालपण अतिशय हलाखीत गेले. मी 4 वर्षांचा असताना माझे आई-वडील गेले. माझ्या आईच्या मावशीने माझा नि भावंडांचा सांभाळ केला. माझगावला पत्रा चाळीत मी वाढलो. चारी बाजूने पत्रे. भायखळा भाजी बाजारात आमचे एक दुकान होते. पण ते कोणीतरी गिळंकृत केले होते.
स्थानिक नेत्यांच्या मदतीने आम्ही दिवसाला दोन रुपये भाडे मिळवायला सुरुवात केली. रोज 2 रुपये घ्यायचे, जमेल तशी भाजी गोळा करून फूटपाथवर आम्ही विकत बसायचो. मोठा झालो तसा भायखळ्याच्या भाजीबाजारातून आम्ही सकाळी 3 वाजता भाजी आणायचो. सकाळी 2-3 मैल
चालणे त्या वयात खूप अवघड असते." असे विविध प्रसंग भुजबळ यांनी सांगितले आहेत.
1973 मध्‍ये पहिल्‍यांदा जिंकले निवडणूक..
मॅकॅनिकल इंजीनियरिंगमध्‍ये डिप्लोमा मिळवल्‍यानंतर भुजबळ बाळासाहेब ठाकरे यांच्‍या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेशी जुळले. पुढे 1973 मध्‍ये भुजबळ यांनी पहिल्‍यांदा शिवसेनेकडून नगरसेवकासाठी निवडणूक लढवली. ते निवडूणही आले. 1973 ते 1984 दरम्‍यान मुंबईच्‍या नगरसेवकांमध्‍ये भुजबळ यांचे नेतृत्‍व प्रभावी होते. यामुळेच ते दोन
वेळा मुंबई महानगरपालिकेचे महापौरही राहिलेत. महापौर असताना त्‍यांनी 'सुंदर मुंबई, मराठी मुंबई' नावाचे अभियान चालवले. पुढे ते राष्‍ट्रवादीमध्‍ये गेले. कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या सरकारमध्‍ये पहिल्‍यांदा ते महाराष्ट्राचे उपमुख्‍यमंत्री बनले.
पुढील स्‍लाइड्समध्‍ये क्‍लिक करून बघा भुजबळ यांच्या आलिशान फार्म हाऊसचे 10 फोटो.... वाचा, भुजबळांचा बंगला 100 कोटींचा... आत स्विमिंग पूल, जिमसारख्या सुविधा... लोणावळ्याच्या बंगल्यात हेलिपॅड.... वाचा बरेच काही....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)