आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझगावपासून महाराष्‍ट्र सदनापर्यंत जाणून घ्‍या, छगन भुजबळांचा प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनी लॉंडरिंग प्रकरणात अटक झालेले राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी खासदार छगन भुजबळ यांना काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली. ईडीच्‍या विशेष कोर्टासमोर आज (मंगळवार) सादर केले जाणार आहे. त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना आधीच अटक करण्यात आली आहे. भुजबळ कुटुंबीयांकडून 840 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या संग्रहात जाणून घेऊया भुजबळ यांचा मातोश्रीपासून आजपर्यंतचा प्रवास..
- लढवय्ये नेते अशी भुजबळ यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील ओळख राहिलेली आहे.
- शिवसेनेबरोबर, काँग्रेस त्‍यानंतर 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांचा संघर्ष सुरू राहिला.
- शिवसेनेने भुजबळ यांना विशेष ओळख दिली. येथूनच त्‍यांच्‍या राजकारणाला सुरूवात झाली.
- शिवसेना खेडोपाडी पोहचवण्‍यात भुजबळ यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
- 1973 साली भुजबळ मुंबई महापालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडून गेले.
- येथूनच छगन भुजबळ यांच्‍या राजकीय प्रवास सुरूवात झाली.
- नगरसेवकापासून उपमुख्यंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्‍या भुजबळ यांच्‍यावर अनेक राजकीय आरोप झाले.
- ईडीने दहा तास चौकशी करून भुजबळांना अटक केल्यानंतर आपण निर्दोष असल्‍याचे सिद्ध करण्‍यात भुजबळ अपयशी ठरले.
महाराष्‍ट्र सदन घोटाळा कसा घडला..
आघाडी सरकारने दिल्‍लीमध्‍ये 100 कोटी रूपये खर्चून नवीन महाराष्‍ट्र सदन बांधले. त्‍यासाठी सरकारने के. एस. चिमणकर इंटरप्रायझेसला 4.5 लाख चौरस फूट चटई क्षेत्रफळ भेट दिले.
एखादे कंत्राट देताना विकासकाला नफ्यात 20 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत देण्‍याची मुभा आहे. मात्र, या प्रकरणात 80 टक्‍के फायदा दिला. त्‍याबदल्‍यात चिमणकरांनी भुजबळ व त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या कंपन्‍यांना आर्थिक लाभ दिल्‍याचा आरोप आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, भुजबळ यांचा राजकीय प्रवास..