आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मुंबई शहर आणि मुंबईकर म्हणजे कायम धावणारे असे म्हटले जाते. मात्र याच धावणार्या मुंबईकरांपैकी 48 टक्के लोकांना ह्रदयविकाराचा धोका असल्याचे समोर आले आहे. त्याचे कारण लठ्ठपणा, 50% लोकांमध्ये वाढते कोलेस्ट्रॉल आणि 64% लोकांमध्ये व्यायामाचा अभाव आहे.
देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात 1.8. लाख लोक सहभागी झाले होते. यात 29,017 मुंबईकरांचा समावेश होता. या सर्वेक्षणानुसार 70 टक्के शहरी भारतीयांना ह्रदयरोगाचा धोका आहे. प्रत्येक शहरातील ह्रदयरोगीच कारणे मात्र वेगवेगळी आहेत.
मुंबईकर हे कायम धावत असतात असे सर्वश्रृत असले तरी, या सर्वेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष सांगतात की, गतिहीन जीवनशैली, तणावग्रस्त वातावरणातील काम आणि आहारातील तडजोड यामुळे 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींना ह्रदयरोगाचा धोका वाढला आहे.
इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतील व्यक्ती कमी लठ्ठ असल्याचे सर्वेक्षण सांगते. दिल्ली आणि चंदीगड येथे सर्वाधिक (54%) लठ्ठ व्यक्ती आहेत. तर मुंबईत हे प्रमाण 48% आहे. लठ्ठपणाचे सर्वात कमी प्रमाण कोलकत्यात (47%) अढळून आले आहे.
सफोला लाइफने केलेल्या या सर्वेक्षणात मुंबई, दिल्ली, चंदीगड, कोलकता, चेन्नई, हैदराबाद, पुणे, बंगळुरू या शहरांची निवड करण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.