आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहारनपूरच्या भीम आर्मीची मुंबईत स्थापना, शेकडो तरुणांनी संघटनेत प्रवेश केला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे दलित अत्याचारप्रकरणी उभ्या केलेल्या लढ्यातून प्रकाशझोतात आलेल्या भीम आर्मीची रविवारी मुंबईतील चैत्यभूमीवर स्थापना करण्यात आली. या वेळी भीम आर्मीचे केंद्रीय प्रचार प्रमुख राकेश यादव यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांनी संघटनेत प्रवेश केला.     
 
देशात दलित आणि अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढले आहेत. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी ‘पँथर’सारखी संघटना पुन्हा सक्रिय व्हावी, अशी मागणी होत होती. दरम्यान, उत्तर प्रदेशात सहारनपूर जिल्ह्यात दलितांवर अत्याचाराचे प्रकरण पुढे आले. त्याविरोधात अॅड. चंद्रशेखर आझाद (रावण) अध्यक्ष असलेल्या भीम आर्मीने लढा उभारला. सोशल नेटवर्किंगवर भीम आर्मी आणि चंद्रशेखरची मोठी चर्चा झाली. 
 
राज्यात आंबेडकरी पक्ष कमकुवत बनले आहेत, त्यामुळे आर्मीसारख्या आक्रमक संघटनेची आवश्यकता तरुण कार्यकर्त्यांना वाटत होती. त्याच भूमिकेतून आज चैत्यभूमी येथे भीम आर्मीची स्थापन करण्यात आली.  भीम आर्मीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी अशोक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...