आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झऱ्यांच्या पाण्यावर तळे, ४ काेटी लि. पाणीसाठा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाऊस बेभरवशाचा झाल्याने शेततळी उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. या तळ्यांचा खुबीने वापर करून कर्जत तालुक्यातील खांडपे गावाने शिवार हिरवेगार करण्याची किमया साधली आहे. डोंगरावरून येणाऱ्या झऱ्यांच्या तोंडालाच पाइप लावून ४ कोटी लिटर एवढे पाणी साठवण्यात आले आहे. ठिबक सिंचनाची जोड देऊन शेती केली जात आहे. बड्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरीला असलेल्या अशोक गायकर यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने गावाचा कायापालट घडवून आणला.
खांडपे गावात राहणाऱ्या गायकर यांनी मित्रांच्या मदतीने १० वर्षांपूर्वी ५८ एकर शेती घेतली. सामुहिक शेतीसाठी मिळणाऱ्या अनुदानातून त्यांनी शेतात विविध उपक्रम राबवले. शेळी-मेंढी पालन, वनदेवता डेअरी, फळे, कडधान्ये, भात लागवड यशस्वी करून दाखवली. सुपीक नसणाऱ्या जमिनीतूनही भरघोस उत्पन्न काढून वेगळा आदर्श त्यांनी उभा केला आणि कृषी पर्यटनालाही दिशा दिली आहे.

विजेविनाच लाखो लिटर पाणी तळ्यात : सामान्यत: शेततळी पावसाने भरतात, पण पावसाचे गणित बिघडले असल्याने गायकर यांनी पर्याय शोधला. एका एकरात एक मोठे व इतर दोन लहान तळी त्यांनी उभारली. डोंगरावरचे पाणी झऱ्यांद्वारे ओघळत येते व वाया जाते. गायकर यांनी या झऱ्यांच्या तोंडाशीच पाइप लावले. हे पाणी सायफन पद्धतीने (गुरुत्वाकर्षणाने पाणी वेगाने खाली) शेततळ्यात साेडले. यंदाचा पहिलाच प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. विशेष म्हणजे विजेचा वापर न करता हे पाणी त्यांनी आणले आहे.
मत्स्यशेती करून १५ लाखांचे उत्पन्न
सर्वात माेठ्या शेततळ्यात पिंजरा पद्धतीच्या वापराने मत्स्य शेतीचा प्रयाेग होत अाहे. तळ्यात ५० हजार फंटूस व साडेसहा हजार जिताडा मासे साेडण्यात येतील. यातून सहा टन माशांच्या उत्पादनातून १५ लाखांचे अतिरिक्त उत्पन्न अपेक्षित अाहे. माशांच्या विष्ठेचे खत िमश्रीत पाणी शेतीसाठी वापरले जाईल.

ठिबक सिंचनाची जाेड
पाणी मुबलक असले तरी प्रवाही पद्धत न वापरता ठिबक करण्यात आले. पिकानुसार पाण्याची गरज ठरवून ठिबकने पाणी दिले जाते. शेततळ्याला ठिबकची जोड असेल तर उत्पन्न दुपटीने वाढेल, असे मत गायकर यांनी व्यक्त केले.