आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारापूर एमआडीसीत भीषण स्फोट; चार ठार , 19 गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तारापूर एमआयडीसीतील आरती ड्रग्ज कंपनीत लागोपाठ चार भीषण स्फोट झाल्याने एका अभियंत्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे. प्रणित पाटील असे या अभियंत्याचे नाव आहे.स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत 19 कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तत्काळ रूग्णालयात दाखल केले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला.

आरती ड्रग्ज कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना हे चार भीषण स्फोट झाले. स्फोट इतके भयानक होते की, स्फोटाच्या हादर्‍याने कंपनीची तीन मजली इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्लॅब कोसळल्यामुळे अनेक जण त्याखाली दाबले गेले असल्याची भीतीही व्यक्त होत आहे.

स्फोटानंतर लागलेल्या आगीत तिघेजण जळून खाक झाले. दोघांचे मृतदेहांचा कोळसा झाल्याने त्यांची ओळख अद्याप पटू शकली नाही.