आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वांद्रे पूर्वेमधील बेहराम पाड्यात 5 मजली इमारत कोसळली, 6 ठार, तीन जण गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वांद्रे परिसरातील बेहरामपाडा भागात पाचमजली इमारत कोसळून तीन मुली आणि तीन मुलांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी घडली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल नेण्यात अाले.
वांद्रे येथील अनंत कान्हेकर मार्गावरील नॅशनल स्कूलजवळ पाचमजली रहिवासी इमारत आहे. दुपारी अचानक पाचव्या मजल्यावरील काही भाग कोसळला. त्यानंतर काही वेळातच सर्व रहिवासी इमारतीच्या बाहेर आले. त्यानंतर क्षणार्धात इमारत पूर्णत: कोसळली. यात सहा मुले ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती देण्यात आली. काही तासांच्या परिश्रमानंतर जवानांनी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, मृत मुलांची नावे समजू शकली नाहीत.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी 1 ते 1.30 दरम्यान वांद्रे पूर्व येथे एसआरडीच्या इमारतीचा काही भाग कोसळला. निसार खान यांच्या कुटुंबातील 7 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महिला आणि मुले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या बाजुच्या घर अकबर ह्यांच्या होते. त्यात एक महिला आणि एक मुलगी 10 वर्षाची होती ती गंभीर जखमी झाली असून दोघांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून, एक अॅम्बुलन्स पोहोचली आहे.
350 अवैध बांधकामे तोडण्याचे आदेश
वांद्रयातला बेहरम पाडा हा अवैध बांधकामांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या भागात महापालिकेने 350 अवैध बांधकामे तोडण्याचे आदेश दिले होते. याआधी भिवंडीतही अशाच प्रकारे तीन मजल्यांची इमारत कोसळली होती. त्यात दुर्घटनेत 23 लोक गंभीररीत्या जखमी झाले होते.

मृतांची नावे
1) आयशा अकबर खान (12)
2) अलिनीसार अहमद खान (3)
3) ओसामा निसार खान (14)
4) हाबीबा निसार खान (2)
5) आफिफा निसार खान (1)
6)रुसुदा निसार अहमद खान (16)

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, घटनेेचे फोटोज आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...