आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडाळ्यातील भक्ती पार्कमध्ये आढळले चार मृतदेह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वडाळ्यातील भक्ती पार्क या उच्चभ्रू वसाहतीत एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सोमवारी संशयास्पदरीत्या आढळले. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. डोनॅटो अँथनी, पत्नी लिझ, मुले जसोन आणि बबीत अशी मृतांची नावे आहेत. भक्ती पार्क येथे अँथनी पत्नी आणि दोन मुलांसह फ्लॅटमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी अँथनी यांनी आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला परदेशात जायचे आहे, असे सांगून फ्लॅटच्या डुप्लिकेट चाव्या भाऊ अनिलकडे दिल्या.सोमवारी सकाळी अनिल यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना चौघांचे मृतदेह आढळून आले. या वेळी सर्वांच्या चेहर्‍यांवर प्लास्टिकच्या बॅग बांधण्यात आल्या होत्या, तर अँथनी यांचे हात मागून बांधण्यात आले होते.