आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Former Cm & Cm Came Together At Today Evening At Mumbai

महाराष्ट्राचे चार आजी-माजी मुख्यमंत्री आज सायंकाळी मुंबईत एकाच व्यासपीठावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील आढावा घेतलेले 'चरैवति! चरैवति!!' या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे. - Divya Marathi
उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील आढावा घेतलेले 'चरैवति! चरैवति!!' या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे.
मुंबई- उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील आढावा घेतलेले 'चरैवति! चरैवति!!' या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी 6 वाजता मुंबईतील यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या पुस्तकाचे प्रकाशन होईल. यावेळी राज्याचे चार आजी-माजी दिग्गज मुख्यमंत्री हजेरी लावतील.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह शरद पवार, मनोहर जोशी आणि सुशीलकुमार शिंदे हे माजी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. हे सर्व आजी-माजी मुख्यमंत्री काय फटकेबाजी करतात व जुन्या आठवणींना उजाळा देतात हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
राम नाईक मूळचे सांगलीचे. मात्र, मुंबईत स्थिरावले. पत्नी शिक्षिका असल्याने राम नाईक यांनी वयाच्या 35 व्या नोकरी सोडली आणि त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. पुढे जनसंघ, भाजप असे संघटनेत काम करीत खासदारकी ते केंद्रीय मंत्रीपद अशी त्यांनी झेप घेतली. मात्र, 2004 साली त्यांना नवख्या गोविंदाकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही खचून न जाता त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले. याच दरम्यान त्यांना कर्करोगाने गाठले. मात्र, त्यावर त्यांनी प्रयत्नांची पराकष्ठा घेत त्यावरही मात केली. 2014 साली वाढते वय लक्षात घेता संघटनेतील पुढच्या पिढीतील नेत्यांना संधी द्या असे नाईक यांनी पक्षनेतृत्त्वाला सांगितले.
2014 साली मुंबईतील सर्व जागा भाजप-सेना युतीने जिंकल्या. राम नाईक उभे राहिले असते तर ते सुद्धा सहज निवडून आले असते. मात्र, त्यांनी थांबणे पसंत केले. 2014 साली केंद्रात मोदी सरकार बहुमतात येताच राम नाईक यांच्यासारख्या तत्वनिष्ठ माणसाला मोदींनी देशातील सर्वात मोठ्या राज्याचे राज्यपालपद बहाल केले.
सध्या ते यूपीची राजधानी लखनौ येथे राजभवनात असतात. अखिलेश यादव यांनी त्यांच्या कामकाजाबाबत काही तक्रारी केल्या ख-या राम नाईक यांनी वेळीच सावरत वाद होणार नाहीत याची काळजी घेतली. आजच्या राजकारणात राम नाईक यांच्यासारखे नेते दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय व सामाजिक आत्मकथन नक्कीच प्रेरणादायी असेल. इंकिंग इनोव्हेशन्स प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून, याची किंमत 300 रूपये इतकी आहे.