आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Minors From Mumbai Raped A 10th Standard And Spread Video Of Rape

दहावीतील विद्यार्थिनीवर चार वर्गमित्रांचा बलात्‍कार, बनवली व्‍हिडिओ क्लिप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
मुंबई - मुंबईतील मलाड परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीवर तिच्‍याच चार अल्‍पवयीन वर्ग मित्रांनी सामूहिक बलात्‍कार करून व्‍ह‍िडिओ चित्रि‍करण केले. पीडित मुलीच्‍या एका नातेवाईक महिलेच्‍या वॉट्सअॅपवर याची व्‍हि‍डिओ क्‍लीप आल्‍याने बुधवारी या प्रकरणाचा भांडाफोड झाला. पोलिसांनी चारही मुलांना अटक करून न्‍यायालयात हजर केले. न्‍यायालयाने त्‍यांची रवानगी बाल सुधारगृहात केली.
व्‍हायरल झाला व्‍हिडिओ
- आरोपी मुलांनी या प्रकराचे व्‍हिडिओ चित्रीकरण करून पीडित मुलीला ब्लॅकमेल करून वारंवार तिच्‍यावर बलात्‍कार केला. शिवाय, या बाबत कुणाला काही सांगितले तर हा व्‍हिडिओ इतर मित्रांना शेअर करण्‍याची धमकी दिली.
- नंतर व्‍हिडिओ व्‍हायरल झाला. पुढे पीडित मुलीच्‍या एका नातेवाईकाकडे तो पोहोचला.
- जेव्‍हा नातेवाईकाने या व्‍हिडिओ बाबत पीडित मुलीकडे विचारणा केली तेव्‍हा तिने आपबिती सांगितली. त्‍या नंतर 25 नाव्‍हेंबरला या प्रकरणी मलाड पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍यात आली.

पुढे वाचा, चार मुलांच्‍या जाळ्यात कशी फसली मुलगी...