आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: नेव्हीचे आणखी एक रेस्‍क्‍यू ऑपरेशन, 14 क्रू मेंबर्सना वाचवले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईच्या किनार्‍यावर दोन दिवसांपूर्वी अडकलेल्या जिंदाल कामाक्षी या जहाजावरील २० खलाशांची सुटका केल्यानंतर बुधवारी भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने आणखी एक धाडसी बचावकार्य पार पाडले आहे. इंजिनात बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या किनाऱ्यापासून १५ किमीवर असलेल्या उमरगाव किनाऱ्यानजीक समुद्रात उभ्या असलेल्या एमव्ही कोस्टल प्राईड या मालवाहू जहाजावरील १४ खलाशांची या संयुक्त बचावकार्य मोहिमेच्या माध्यमातून सुटका करण्यात आली.

बुधवारी सकाळी सातच्या सुमारास एमव्ही कोस्टल प्राईड या जहाजावरून तटरक्षक दलाच्या मेरिटाईम रेस्क्यु कोऑर्डीनेशन संेटर येथे मदतीसाठीचा संदेश अाला. त्यानंतर तटरक्षक दल आणि नौदलाच्या संयुक्त बचावकार्याला सुरूवात केली. दमण येथील तटरक्षक दलाच्या तळावरून सकाळी ७.४० वाजता जहाजाच्या दिशेने चेतक हे हेलिकाॅप्टर झेपावले. त्याच वेळी तटरक्षक दलाच्या मदतीसाठी मुंबईतील नौदलाच्या तळावरून सी किंग हे नौदलाचे हेलिकाॅप्टर झेपावले. जहाजावर पोहोचल्यानंतर तटरक्षक दलाच्या चेतक या हेलिकॉप्टरने दोन फेऱ्यांमध्ये जहाजावरच्या खलाशांना उमरगावच्या किनाऱ्यावर सुखरूप पोहोचवल्याची माहिती ‘पीआयबी’ने दिली आहे. मात्र तोपर्यंत जहाज बुडू लागल्याने नौदलाच्या सीकिंग आणि तटरक्षक दलाच्या चेतक या दोन्ही हेलिकॉप्टर्सनी तिसऱ्या फेरीत सर्व खलाशांची सुटका केली.

वारा, पावसामुळे अडचणी येत असतानाही ही मोहीम पार पाडल्याने नौदल तटरक्षक दलाचे कौतुक करण्यात येत आहे. हे जहाज गेल्या दोन दिवसांपासून इंजिनात बिघाड झाल्याने या ठिकाणी नांगर टाकून होते. मात्र वाऱ्यामुळे हे जहाज एका बाजुला कलंडू लागले होते.
पुढे स्लाईडसच्या माध्यमातून पाहा, यासंबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...