आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Option Of Spots For Balasaheb Thackeray, But Prority To Dadar

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी चार जागांचे पर्याय, मात्र प्राधान्य दादरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे घोडे दोन वर्षांनंतर पुढे सरकले आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीने दक्षिण मुंबईतील चार जागा निवडल्या आहेत. ठाकरे कुटुंबीयांच्या सहमतीनंतर त्यातील एका जागेची लवकरच निश्चिती केली जाणार आहे. स्मारकाच्या उभारणी विश्वस्त मंडळाकडून की सरकारतर्फे करायची याचा निर्णय बाकी आहे. मात्र, ठाकरे कुटुंबीयांच्या सूचना लक्षात घेतल्या जाणार आहेत.

महापौर बंगला (दादर), पार्क क्लब (शिवाजी पार्क), वडाळा आणि बॉम्बे डाइंग (परळ) या जागा आता निवडण्यात आल्या असून यातील पहिल्या दोन जागा पालिकेच्या आहेत.