आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत रेल्वेखाली येऊन चार गँगमन ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रूळ दुरुस्तीचे काम सुरू असताना वेगाने कोयना एक्स्प्रेसच्या धडकेने 4 गँगमन ठार झाल्याची घटना ठाकुर्ली-कल्याण रेल्वेस्थानकाजवळ रविवारी सकाळी घडली. जयचंद गंगाराम (53), दत्तात्रय देवाजी (56), पांडुरंग काशीनाथ (53) आणि हरी नाना अशी मृतांची नावे आहेत. कोल्हापूरहून भरधाव येणार्‍या कोयना एक्स्प्रेसने चौघांना उडवले. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.