आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर विक्री करणारे चार हजार शेतकरी रडारवर, खरेदीत घोटाळा झाल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बंपर उत्पादनानंतर तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा संशय बळावत आहे. परिणामी राज्य सरकारची ४ हजार संशयित व्यक्तींच्या व्यवहारावर नजर आहे. कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव विजयकुमार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून अहवाल देण्यास सांगितले आहे. मोठ्या प्रमाणात तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवरही नजर ठेवण्यास सांगितले आहे.

गेल्या वर्षी २५ लाख ६० हजार टनाच्या तुलनेत देशात या वर्षी ४२ लाख ३० हजार टन तुरीचे उत्पादन झाले. यात महाराष्ट्राचा वाटा २० लाख टनांहून आहे. नफ्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आडून आपला माल विकला तर नाही ना, असा सरकारला संशय आहे. खरेदीत अधिकारी व व्यापाऱ्यांनी साटेलोटे केले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींविरुद्ध कारवाई करू, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले होते.
बातम्या आणखी आहेत...