आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Thousand School Close Down Due To Ground Condition

मैदानाच्या अटीमुळे चार हजार शाळांना लागणार टाळे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्वसंचालित शाळांच्या मान्यतेसाठी अर्धा एकर जागा आणि 20 लाख रुपये अनामतीची अट घालण्यात आली आहे. या अटीमुळे राज्यातील 4 हजार शाळा बंद कराव्या लागतील. त्यामुळे जागेची जाचक अट रद्द करावी, अशी मागणी मायनॉरिटी असोसिएशन या संस्थेने केली आहे.


महाराष्‍ट्र स्वसंचालित शाळा (स्थापना व नियम) कायदा 2012 हा कायदा राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यानुसार कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्थेला प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मान्यतेसाठी अर्धा एकर मैदान असण्याचे बंधन आहे.
स्वसंचालित शाळांचे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे 7 हजार प्रस्ताव दाखल झालेले आहेत. मैदानाच्या या अटीमुळे त्यातील 4 हजार प्रस्ताव नाकारले जाण्याची शक्यता आहे. परंतु या शाळा मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रत्यक्षात सुरू आहेत. या शाळा सुरू झाल्या तेव्हा मैदानाची अट नव्हती. मागच्या वर्षी त्याबाबत परिपत्रक आले. त्यामुळे मैदानाची अट पूर्ण न करू शकलेल्या शाळा व्यवस्थापनांचे या अटीमुळे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अडचणीत आलेल्या शाळांनी आता उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.


राजकारण्यांना लाभ
राजकारणी लोकांच्या तसेच श्रीमंत शैक्षणिक संस्थांच्या शाळांना या धोरणाचा लाभ होणार आहे. या जाचक अटीचा फटका मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद शहरातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मुख्यत्वे बसणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वकार अन्सारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.