आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीशी बोलतो म्हणून चौथीच्या मुलाची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शाळेतील मुलीशी बोलत असल्याने चौथीतील मुलाची त्याच्याच चार वर्गमित्रांनी डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना वसई येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी 11 ते 12 वयोगटातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. वीरेंद्र मोर्या असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. काही दिवसांपासून वीरेंद्र शाळेतील एका मुलीशी नेहमी बोलत होता. त्यावरून त्याचा या चौघांशी अनेकदा वाद झाला होता. वीरेंद्रला 20 रोजी या चौघांनी वसई स्टेशनच्या मोकळ्या जागेत बोलावले. मुलीशी बोलू नको अशी तंबी दिली. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची हत्या केली.