आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉक्सकॉन कंपनीचे अॅपल जूनमध्ये ‘चाखायला’ मिळणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘अॅपल’ उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी फॉक्सकॉन कंपनीने राज्य सरकारशी गेल्या वर्षी करार केला होता. एक वर्षाच्या आत राज्यात अॅपलच्या उत्पादनांची (अायफाेन, अायपॅड) निर्मिती सुरू करू असेही फॉक्सकॉनतर्फे सांगण्यात अाले हाेते. त्यानुसार कंपनी आपला शब्द पूर्ण करत असून येत्या जूनपासून अॅपल उत्पादनांचे अॅसेम्बलिंग नवी मुंबईत सुरू केले जाणार असल्याची माहिती उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ होत असून लवकरच ताेे चीनलाही मागे टाकेल असे म्हटले जात आहे. भारतात कुशल कामगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने आणि अॅपल उत्पादनांची विक्री देशात वाढत असल्याने फॉक्सकॉन कंपनीने लवकरात लवकर भारतात उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. भारतातच अॅपलची उत्पादने तयार केल्यामुळे त्यांच्या किमतीही आवाक्यात राहू शकतील. प्रकल्प सुरू करण्यासाठी ‘फॉक्सकॉन’ने युद्धपातळीवर काम सुरु केले असून जूनपासून अॅपलच्या उत्पादनांचे अॅसेम्बलिंग राज्यात सुरू केले जाणार आहे, अशी माहितीही संबंधित अधिकाऱ्याने दिली.

अाैरंगाबादमध्येही प्रकल्प उभारण्याचा विचार
नवी मुंबईत तयार जागेला प्राधान्य : फॉक्सकॉन कंपनीला तळोजा, पुणे येथे एमआयडीसीची जागा सरकारतर्फे दाखवण्यात आली होती. परंतु मोकळ्या जागेवर बांधकाम करण्यात खूप वेळ जाणार होता. त्यामुळे तयार असलेली जागा घेण्याकडे कंपनीचा कल होता. त्यानुसार नवी मुंबई येथे त्यांना एका कॉम्प्लेक्समध्ये हवी तशी बांधकाम तयार असलेली जागा मिळाली. त्यांनी ती खासगी जागा विकत घेतली असून तेथे काम सुरू करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न : ‘डीएमआयसी’मुळे औरंगाबादकडे अनेक कंपन्यांचे लक्ष जात असून फॉक्सकॉन कंपनी औरंगाबादमध्येही आपला प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी प्रयत्न करत अाहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्यास फॉक्सकॉन औरंगाबादमध्ये आपले काम सुरू करील, अशी माहितीही उद्येाग विभागातील अधिकाऱ्याने दिली
बातम्या आणखी आहेत...