आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोट्या पत्रिका छापून प्रशिक्षणाला दांडी मारणारे दहा पोलिस बडतर्फ

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नातेवाइकांच्या लग्नाच्या खोट्या निमंत्रण पत्रिका छापून पोलिस प्रशिक्षण अभ्यासक्रमाला दांडी मारणाºया दहा पोलिस कॉन्स्टेबल्सना मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांनी थेट घरचा रस्ता दाखवला आहे. हे कर्मचारी 2010 मध्ये जालना पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयात प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झालेले असताना
गैरहजर राहिले होते.
कॉन्स्टेबल संदेश भोईर, ललित महाजन, गोरक्षनाथ शेखरे, प्रवीण भातमोडे, राहुल पाटील, संदीप निकम यांच्यावर खोट्या लग्नपत्रिका सादर करून सुटी घेतल्याचा आरोप आहे. पूर्वपरवानगी न घेताच प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल भगवान मोरे, राजेश बांगर, महेश म्हात्रे आणि राजकुमार पाटील यांना पोलिस सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व पोलिस कर्मचारी 2009 च्या तुकडीतील आहेत. त्यांना साडेतीन महिन्यांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जालन्याला पाठवण्यात आले होते. पण रजा मिळवण्यासाठी त्यांनी नातेवाइकांच्या खोट्या लग्नपत्रिका छापून अभ्यासक्रमाला बुट्टी मारली. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलातील कर्मचाºयांच्या सध्या मुलाखती (स्क्रीनिंग) सुरू आहेत. त्यात अनेक कर्मचाºयांना प्राथमिक प्रशिक्षणच मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. अर्थात अनेक कर्मचाºयांना प्रशिक्षण मिळाले नसले तरी काहींनी प्रशिक्षणास हेतुपुरस्सर दांडी मारल्याचा प्रकारही उघडकीस आला. वरिष्ठांनी या प्रकाराची खोलवर चौकशी सुरू केल्यानंतर या कर्मचाºयांचे हे प्रताप उघडकीस आले.
मुंबईमध्ये हे कर्मचारी कलिना येथे तैनात होते. केवळ प्रशिक्षणापासून सुटका व्हावी म्हणून पोलिस कर्मचाºयांनी असे गैरप्रकार करणे चुकीचे आहे. ज्यांच्या खांद्यावर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून अशा पद्धतीचे वर्तन होणे आक्षेपार्ह आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत पटनाईक यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.