आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैभववाडीत शिवसेनेच्‍या मोफत आरोग्य शिबीराला उत्‍सफूर्त प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगुळवाडी येथे शिबीरात नेत्र तपासणी करताना डॉक्टर. - Divya Marathi
सांगुळवाडी येथे शिबीरात नेत्र तपासणी करताना डॉक्टर.
सिंधुदुर्ग (वैभववाडी) - तालुक्‍यात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई-अंधेरी येथील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सांगुळवाडी येथील प्राथमिक शाळा आणि खंबाळा येथे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत या शिबिरांचे आयोजन करण्‍यात आले होते. सांगुळवाडीत 215 रुग्‍णांनी याचा लाभ घेतला. 

या शिबिरांमध्‍ये हृदय, किडनी, कर्करोग, तपासणी करण्यात आली. खंबाळा येथे 188 रुग्णांनी याचा लाभ घेतला. तर कल्याणी जनसेवाभावी संस्था, विरार यांच्यावतीने नेञचिकित्सा, मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्‍यात आले. याचा 176 रुग्णांनी लाभ घेतला.
 
ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सुविधा मिळत नाही. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. आरोग्याची तपासणी वेळीच केली तर आजारावर नियंत्रण व मात करता येते. यासाठी अशी आरोग्य शिबीरे होणे गरजेचे आहे. शिवसेनेचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते अतुल रावराणे यांनी यावेळी केले. 
 
शिवसेना तालुका वैभववाडी यांच्यावतीने आयोजित खांबाळे येथील आरोग्य शिबीराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिने दिग्दर्शक दिपक कदम, शिवसेना तालुका प्रमुख तथा पं.स. सदस्य मंगेश लोके, सरपंच  संचीता गुरव, उपसरपंच लहू साळुंखे, दिनेश सावंत, विलास पवार, पांडुरंग गुरव, रुपेश कांबळे, प्रफुल्ल पवार, योगेश पवार, रोशन चव्हाण, आदी उपस्थित होते. 
 
या आरोग्य शिबीरामध्ये डाँ.खाँजा मुजावर, डाँ. रोहन जाधव, सर्व सेव्हन हिल्स हाँस्पीटल तर कल्याणी जनसेवाभावी संस्थेचे चेअरमन पिंकी पाटील, डाँ. रणजीत जैन यांनी रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन केले. या शिबीरासाठी बाळा पालकर व दिपक पवार ( सांताक्रुझ) यांनी विशेष साहाय्य केले. 

सांगुळवाडी प्राथमिक शाळेमध्ये शिबीराच्‍या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख जयेंद्र रावराणे,तालुकाध्यक्ष मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे, सरपंच प्रकाश रावराणे, सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डॉ.ख्वाजा मुजावर, डॉ.रोहन जाधव, कल्याणी जैन सेवाभावी संस्था मुंबईच्या डॉ.पिंकी पाटील, नेत्र चिकीत्सक डॉ.रणजिता जैन,सुशांत मेस्ता, जयदीप साईल, आरोग्य सेवक एस.एन.बोडेकर,यु.एस.काटकर,आर.वाय.पाटील,प्रकाश पाटील,शशिकांत रावराणे,शंकर सुतार,प्रशालेचे मुख्याध्‍यापक एल.व्ही.ढवण, सर्पे सर,शेट्ये सर आदी उपस्थित होते. 
     
 
बातम्या आणखी आहेत...