आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सचा महान फुटबॉलपटू झिनेदिन झिदान मुंबईत, कशी उसळली गर्दी, पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी दुपारी अडीच वाजता झिदान व त्याची पत्नी व्हेरेनिकाचे आगमन झाले तो क्षण... - Divya Marathi
मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी दुपारी अडीच वाजता झिदान व त्याची पत्नी व्हेरेनिकाचे आगमन झाले तो क्षण...
मुंबई- रियल माद्रिदचा विद्यमान प्रशिक्षक व फ्रान्सचा महान फुटबॉलपटू झिनेदिन झिदान गुरूवारी मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी दुपारी अडीच वाजता झिदान व त्याची पत्नी व्हेरेनिकाचे आगमन झाले. झिदानच्या स्वागतासाठी तसेच त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
रिआल माद्रिद फॅन क्लबने तर झिदानसाठी खास बॅनर्स आणि पोस्टर्सही तयार केली होती. मात्र, त्याच्या चाहत्यांची गर्दी पाहता संयोजकांनी त्याला ऐनवेळी मागच्या दरवाजाने बाहेर नेले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली. मुंबईस्थित एका रियल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनीशी केलेल्या करारांतर्गत तो येथे आला आहे. मात्र, झिदानने गुरुवारी एकच दिवस मुंबईत राहिला. आज तो पुन्हा मायदेशी परतेल. मुंबईव्यतिरिक्त तो भारतात इतर ठिकाणी कुठेही जाणार नाही.
या महान फुटबॉलपटूने 1998 मध्ये घरच्या मैदानावर फ्रान्सला विश्वचषक जिंकून दिला होता. तसेच युरो कपसह अनेक मोठे विजय त्याने फान्सला मिळवून दिले आहेत. झिदान सध्या रियल माद्रिदचा विद्यमान प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षणाच्या बळावर रियल माद्रिदचा संघाने यंदाचा युफा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले आहे. ही लढत 28 मे रोजी झाली होती.
माद्रिदने विजेतेपद पटकावताच चॅम्पियन्स लीगचा खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही नात्याने चॅम्पियन्स लीगचे जेतेपद अनुभवणा-या दिग्गज खेळाडूंच्या यादीत झिदानचा समावेश झाला आहे.
पुढे स्लाईडवद्वारे पाहा, मुंबई दौ-यादरम्यानची झिनेदिन झिदानची छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...