आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला गालबोट, मित्रांनीच घात करुन अल्‍पवयीन मुलीवर केला सामुहिक बलात्‍कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वत्र दिवाळीचा उत्‍साह असताना मुंबईत एका अल्‍पवयीन मुलीवर सामुहिक बलात्‍कार करण्‍यात आला. ओळखीच्‍याच लोकांनी तिचा घात केला. याप्रकरणी तिच्‍या 4 मित्रांसह 6 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. मुंबईतील दिंडोशी परि‍सरात हा प्रकार घडला.

प्राप्‍त माहितीनुसार, सामुहिक बलात्‍काराची घटना शुक्रवारी धनत्रयोदशीच्या रात्री घडली. एका 16 वर्षीय मुलीला तिच्‍या मित्राने घरी पुजेसाठी बोलावले होते. हा मित्र गोरेगाव पूर्व भागात राहतो. पुजा झाल्‍यानंतर त्‍याने आणखी दोन मित्रांना बोलावून घेतले. तिला शीतपेयांमध्‍ये त्‍यांनी गुंगीचे औषध दिले. त्‍यानंतर एका निर्जन स्‍थळी नेऊन तिच्‍यावर चौघांनी बलात्‍कार केला. रात्री अकराच्‍या सुमारास त्‍यांनी तिला घरी जाऊ दिले. रविवारी तिने घाबरलेल्‍या अवस्‍थेत सर्व प्रकार आजीला सांगितला. त्‍यानंतर आजीसोबत तिने दिंडोशी पोलिस ठाणे गाठले. बलात्कार केल्याचा गुन्हा दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. याप्रकरणी बलात्कार करणाऱ्या चार जणांवर तर मुलीला घटनास्थळी आणणारे दोघे अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.