आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Frienship Era Again In BJP Nationalist Congress In State

भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात पुन्हा ‘मैत्री पर्व’! विधान परिषदेचे सभापतिपद राष्ट्रवादीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अल्पमतात सत्तारूढ झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसशी अजूनही भाजपचा ‘मधुचंद्र’ सुरूच आहे. राष्ट्रवादीने केलेल्या मदतीची विधान परिषदेत परतफेड करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याचे कळते. हिवाळी अधिवेशनादरम्यान परिषदेच्या सभापतींवर राष्ट्रवादीने आणलेल्या अविश्वासाचे घोडे आता भाजपच्या मदतीने पुन्हा दामटले जाणार असल्याची चर्चा असून परिषदेचे सभापतिपद राष्ट्रवादीला मिळवून देतानाच उपसभापतिपद आपल्याकडे खेचून आणण्याचा भाजपचा डाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेला ‘भाजप-राष्ट्रवादीची ही मैत्री’ पचनी पडेल काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपसमोरील अडथळे व काँग्रेसला मात देण्यासाठी राष्ट्रवादीचा सुरू असलेला खटाटोप या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजपने एक संयुक्त रणनीती आखल्याची चर्चा आहे. यानुसार ज्येष्ठ भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांना विधान परिषदेचे उपसभापतिपद, तर चैनसुख संचेती यांना विधानसभा उपाध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय भाजपमध्ये झाल्याचे वृत्त आहे. मात्र पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मंजूरीनंतरच या सर्व घडामोडींना अंतिम रुप येऊ शकते.

सभापतिपद राष्ट्रवादीला देऊन या पदावरून काँग्रेसला पायउतार करायचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद देऊन काँग्रेसचे समाधान करायचे, असे डाव राष्ट्रवादी- भाजपतर्फे आखण्यात आले आहेत. हे रणनीती यशस्वी झाल्यास राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे विरोधी पक्षनेतेपद औटघटकेचे ठरू शकते.

पुढे वाचा काय आहेत राष्ट्रवादी आडाखे?