आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत महाराष्‍ट्राच्‍या लेडी सिंघम, केवळ एक चपराक लगावून थांबवली होती दंगल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्‍य सरकारने 104 'आयपीएस' अधिकाऱ्यांची बदली केली आहे. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा फेरबदल आहे. यामध्‍ये विशेष चर्चा आहे ती IG अर्चना त्‍यागी यांच्‍या बदलीबद्दल. मुंबईच्‍या सहाय्यक आयुक्‍तपदी त्‍यांची बदली करण्‍यात आली आहे.  आपल्‍या कणखर भूमिकेसाठी त्‍या ओळखल्‍या जातात. एका घटनेत दंगलीमध्‍ये मध्‍यस्‍थी करुन त्‍यांनी एका मवाल्‍याला अशी काही चपराक लगावली होती की, त्‍यामुळे काही क्षणांतच पूर्ण वातावरण शांत झाले होते. त्‍यांच्‍या अशा धाकामुळे गुंडही त्‍यांना दचकून असतात.
 
एका चपराकीमुळे शहरात दरारा
- अर्चना यांची पहिली पोस्‍टींग साताऱ्यातील कराड येथे झाली होती. त्‍या तेथे एएसपी म्‍हणून जॉईन झाल्‍या होत्‍या. 
-  हा भाग धार्मिकदृष्‍ट्या महत्‍त्‍वाचा सोबतच संवेदनशिल मानला. येथे सतत दोन गटांमध्‍ये वाद किंवा मारहाणीच्‍या घटना घडत असतात. 
- अर्चना या ठिकाणी जॉईन झाल्‍या त्‍याच दिवशी कराडमध्‍ये दोन गटांत जोरदार मारहाण झाली. 
- याची माहिती मिळताच अर्चना त्‍यागी तत्‍काळ घटनास्‍थळी पोहोचल्‍या. सुरुवातीला त्‍यांनी दोन्‍ही गटांना समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांचे काहीही एकूण न घेता गटांनी पोलिसांविरोधातच घोषणाबाजी सुरु केली. 
- तेव्‍हा अर्चना यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांमधील एकाला जोरदार चपराक लगावली. अर्चना यांचा हा रुद्रावतार पाहून घोषणाबाजी करणारे एकदम शांत झाले आणि काही तासांतच वातावरण पूर्णपणे निवळले. 
- आजही तेथील नागरिकांमध्‍ये अर्चना त्‍यागी यांच्‍या या चपराकीबद्दल चर्चा सुरु असते. 'त्‍यागी मॅडमने चपराक लगावली, तेव्‍हा कुठे सर्व शांत झाले', असे ही घटना प्रत्‍यक्ष पाहणारे लोक सांगतात.       
- अर्चना त्‍यागी यांच्‍या अशा दबदब्यामुळे कराडमध्‍ये मारहाणीच्‍या घटनांना बराच लगाम लागला होता. मात्र अचानक त्‍यांची बदली झाल्‍याने कराडवासियांनी याबद्दल नापसंती दर्शवली आहे. 
 
या कारणामुळे आहेत चर्चेत 
- अर्चना त्‍यागी यांनी आपल्‍या कारकिर्दीत अनेक बिअर बारवर छापे टाकले, अमली पदार्थांची तस्‍करी करणारे रॅकेट पकडले, खुनाच्‍या अनेक प्रकरणांचा त्‍यांनी छडा लावला आहे, अवैधरित्‍या भारतात घुसणाऱ्या कित्‍येक बांग्‍लादेशींना त्‍यांनी हद्दपार केले आहे. 
- कायदा आणि सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी त्‍यांचा नेहमी संवादावर भर राहिला आहे. 
 
डेहरादूनच्‍या रहिवासी आहेत त्‍यागी 
- अर्चना त्‍यागी मूळ डेहरादूनच्‍या रहिवासी आहेत. 
- त्‍यांनी जवाहरलाल नेहरु यूनिव्‍हर्सिटीमधून सोव्हियत इकॉनॉमिक्‍समध्‍ये एमफील केले आहे. 
- केवळ 21 वर्षांच्‍या असताना देहरादूनमधील कॉलेजमध्‍ये त्‍यांनी लेक्‍चरर म्‍हणून काम केले आहे. 
- शिकवत असतानाच त्‍यांनी UPSCची तयारी केली आणि त्‍यात यश मिळवत महाराष्‍ट्र केडरमधून आयपीएस म्‍हणून त्‍यांना निवडण्‍यात आले. 

जिमने सुरु होतो दिवस 
- अर्चना त्‍यागी यांच्‍या दिवसाची सुरुवात जिमने होते. 
- 1999मध्‍ये रत्‍नागिरीच्‍या एसपी असताना त्‍यांनी पोलिसांसाठी योग बंधनकारक केले होते. 
- महिलांच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी त्‍यांनी विशेष महिला पोलिस पथकाचीही निर्मिती केली होती.  
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अर्चना त्‍यागी यांचे निवडक फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...