आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली होती मुंबई, सर्वत्र पडला होता मृतदेहांचा सडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअर इंडिया बिल्डिंग - Divya Marathi
एअर इंडिया बिल्डिंग
मुंबई- 1993 साली मुंबई 13 साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. ठिकठिकाणी मृतदेहांचा सडा पडला होता. स्फोटातील एक दोषी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नागपूर येथील मध्यवर्ती तुरुंगात 30 जुलैला त्याला फासावर लटकवले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर Divyamarathi.com ने आपल्या वाचकांसाठी विषेश पॅकेज घेऊन आले आहे. 12 मार्च 1993 रोजी दोन तासांच्या कालावधीत मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाची माहिती देत आहोत. या स्फोटाचा मुख्यसूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असून तो अद्याप फरार आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला 30 जुलैला फासावर लटकवले जाणार आहे. मुंबईतील टाडा कोर्टाने 53 वर्षीय याकूबला फाशीची शिक्षा सुनावली होती. 12 मार्च 1993 रोजी दोन तासांच्या कालावधीत मुंबईत झालेल्या 13 साखळी बॉम्बस्फोटाने हाहाकार उडाला होता. दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी पेरुन ठेवलेले बॉम्बचा एकापाठोपाठ स्फोट झाल्याचे मुंबईचे मोठे नुकसान झाले होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगमध्ये पहिला स्फोट झाला.
बीएसईच्या बिल्डिंगमध्ये पहिला स्फोट...
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) बिल्डिंगमध्ये 12 मार्च रोजी दुपारी 1 वाजून 28 मिनिटांवर पहिला स्फोट झाला. स्फोटाचा आवाजाचाने मुंबईच्या कानठळ्या बसल्या इतका भयावह होता. 29 मजली बीएसईच्या बिल्डिंगमध्ये अक्षरश: मृतदेहांचा सडा पडला होता. चारही बाजूला मृतदेहच दिसत होते. स्फोट झाला तेव्हा या बिल्डिंगमध्ये जवळपास दोन हजार लोक उपस्थित होते. बेसमेंटमधील पार्किंगमध्ये आरडीएक्स भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला होता. या 84 लोकांचा मृत्यू झाला होता. 200 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते. पुढील दहा मिनिटांत नर्सी नत्था स्ट्रीटवरील धान्य बाजारात उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये स्फोट झाला. पुढील 50 मिनिटांत स्टॉक एक्सचेंजपासून जवळच असलेल्या एअर इंडियाच्या इमारतीलच्या पार्किंगमध्ये जबरदस्त स्फोट झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, 1993 मध्ये मुंबई आलेल्या संकटाचा कहाणी