आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद हज हाऊससाठी यावर्षी २.९४ काेटींचा निधी मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद येथील हज हाऊसच्या बांधकामाच्या २९.८८ कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्प खर्चास राज्य सरकारने मान्यता दिली असून यापूर्वी ४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यंदाच्या वर्षासाठी आणखी २.९४ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय अल्पसंख्याक विभागाने घेतला असून तसा शासनादेश काढण्यात आला आहे.

औरंगाबाद येथील सर्व्हे क्रमांक ६५५६ येथील शाही मस्जिदजवळ हज हाऊसचे बांधकाम सिडकोमार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी सिडकोबरोबर सामंजस्य करारही करण्यात आला आहे. हज हाऊसच्या बांधकामाचा एकूण खर्च २९.८८ कोटी आहे. सिडकोला राज्य सरकारने यापूर्वी चार कोटी रुपये दिले असून सामंजस्य करारानुसार सिडकोला टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जात आहे. त्यानुसार २०१५-१६ करिता २.९४ कोटी रुपये सिडकोला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी पहिल्या आठ महिन्यांसाठी अर्थसंकल्पात हज हाउसच्या बांधकामाकरिता ४.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य हज समितीच्या कार्यकारी अधिकार्‍यांनी सि़डकोच्या उपाध्यक्षांच्या नावे धनादेश काढून सुपूर्द करावा आणि खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र घ्यावे, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...