आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadkari, Ajit Pawar Attended Number Of Election Rally

राज्यातील प्रचार सभेत दोघेच अग्रभागी; गडकरींचे शतक, अजित पवार ‘ऐंशी’त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थंडावल्या. या प्रचाराच्या रणधुमाळीत राज्याच्या विकासाच्या प्रश्नांवर सखोल चिंतन होण्यापेक्षा एकमेकांवर चिखलफेक करण्यातच नेत्यांनी धन्यता मानली. प्रचारातील भाषेचा स्तर हा खालच्या पातळीवर गेलेला दिसला.

राज्यात सर्वच पक्षांचे प्रमुख नेते मैदानात उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २७ सभा घेत पुन्हा एकदा राज्यात मोदी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ४ तर उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ६ सभांना संबोधित केले. या निवडणुकीत सर्वाधिक सभा घेण्याचा मान भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना जातो. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा क्रमांक लागतो. गडकरी यांनी तब्बल १०४ तर पवारांनी ८० जाहीर सभांच्याद्वारे राज्य ढवळून काढण्याचा प्रयत्न केला. तिसरा क्रमांक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा लागत असून त्यांनी ७० जाहीर सभांना संबोधित केले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ५५ तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५० आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ४० सभांना संबोधित केले. काँग्रेसकडे राज्य पातळीवर चव्हाण आणि राणेवगळता एकही स्टार प्रचारक नसल्याने आणि इतर सर्व नेते आपापल्या बालेकिल्ले राखण्यात व्यग्र होते.

शिवसेना आणि मनसे यांच्यात मराठी मतांवर मक्तेदारी स्थापन करण्यासाठी संघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यापेक्षा अधिक सभांना संबोधित करून किमान प्रचारात तरी आघाडी घेतली. राजकीय सभेत विनोदी कविता आणि मनोरंजनासाठी ओळखले जाणारे रामदास आठवले यांनीही ४२ सभांना संबोधित केले आहे.