आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadkari, Munde Also In Irrigation Scam Allege By Medha Patkar

सिंचन घोटाळ्यात गडकरी- मुंडेही!, मेधा पाटकरांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सिंचन घोटाळ्यातील रकमा सत्ताधारी नेत्यांबरोबरच नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत पोचत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबतची कागदपत्रे त्यांनी सादर केली.

2009 मध्ये कोल्हापूर इन्फ्रा प्रोजक्ट आणि बी. टी. पाटील अ‍ॅँड सन्स या ठेकेदारांच्या कार्यालयावर आयकर छापे टाकले होते. त्यात या कंपन्यांचा सीए धीरेंद्र भट याच्या डायरीमध्ये कोणाला किती रकमा दिल्या याच्या नोंदी असल्याची माहिती पाटकर यांनी दिली.

विदर्भातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचे 287 कोटींचे काम वरील दोन्ही कंपन्यांना मिळाले होते. या प्रकल्पातील 43 कोटीच्या रकमा कुणाकुणाला दिल्या त्याच्या नोंदी भट यांच्या डायरीत आहेत. अजित पवार यांना 27 कोटी, नितीन गडकरी यांना 50 लाख, गोपीनाथ मुंडे यांना 20 लाख, तसेच पाटबंधारे खात्यातील विविध अधिका- यांना दिलेल्या रकमांचे स्पष्ट उल्लेख या डायरीत मिळाले आहेत, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, आपल्याला कोणीही लाच दिली नसल्याचे सांगत अजित पवार यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.