आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहांची उचलबांगडी होणार, राजनाथ- गडकरी पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/ दिल्ली- बिहारमध्ये भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांची उचलबांगडी होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. भाजपात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांची एकाधिकारशाही वाढत असल्याने शहांना हटविण्याच्या निर्णयापर्यंत संघाचे नेते आल्याचे समजते आहे. सरकारमध्ये मोदींचे एकतर्फी वर्चस्व तर पक्षसंघटनेत शहांचा एकहाती कारभार पक्षाला घातक ठरत असल्याची पक्षातील अनेक नेत्यांनी संघाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे येत्या जानेवारी होऊ घातलेल्या पक्षाध्यक्ष निवडीत अमित शहांना दुसरी टर्म न देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे संघाच्या सूत्रांनी सांगितले. शहांच्या ऐवजी माजी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांची नवे पक्षाध्यक्ष म्हणून नावे चर्चेत आहेत. मोदी-शहांच्या गोटातून जे पी नड्डा यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये भाजपचा दारूण पराभव झाला. या पराभवाला पक्षाध्यक्ष अमित शहा कारणीभूत असल्याचे भाजपमधील नेत्यांचे म्हणणे आहे. बिहार निवडणूक लढविवताना स्थानिक नेत्यांना मोदी-शहांनी विश्वासात घेतले नाही. भाजपच्या जाहिरात व पोस्टरवर फक्त मोदी-शहांचे फोटो होते. स्थानिक नेत्यांमधून कोणाही नेत्यांचे नाव पुढे केले गेले नाही. त्यामुळेच बिहार भाजपमध्ये निवडणुकीपूर्वीच मोठी खदखद होती. मात्र, मोदी-शहांच्या निर्णयानंतर विरोध कोण करणार? असा प्रश्न होता. मात्र, याला वाचा फोडली ती सर्वप्रथम शॉर्टगन शत्रूघ्न सिन्हा. अमित शहांनी सिन्हा यांना बिहार निवडणुकीत जाणून-बुझून दूर ठेवले. त्यामुळे सिन्हा थेट नितीशकुमार-लालूंच्या गोटात सामील झाले. बिहारमध्ये दलित किंवा मागासवर्गीय मुख्यमंत्री होईल अशी हवा सोडून दलित-ओबीसी मते खेचण्याच्या नादात सुशीलकुमार मोदी सारख्या नेत्यांनी निवडणुकीतून अंग काढून घेतले.
मुस्लिम नेता शहनवाज झुसेन, राजपूत नेता राजीवप्रताप रूडीसारख्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले नाही. परिणामी भाजपचा दारूण पराभव झाला. भाजपला कशा-बशा 53 जागा मिळाल्या. त्यातील 20 आमदार केवळ एक हजार मतांच्या आसपास फरकाने जिंकून आले आहेत. त्यामुळे 2010 साली 91 जागा जिंकणा-या भाजपला नैतिक अर्थाने 30-32 च जागा मिळाल्या असे मानावे लागेल. यामागे अमित शहांची एकाधिकारशाही व महत्त्वाच्या नेत्यांना विश्वासात न घेणे ही कारणे सांगितली गेली आहेत. संघाने बिहार निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण केले आहे. या पराभवाला पंतप्रधान मोदी नव्हे तर अमित शहा जबाबदार असल्याच्या निष्कर्षापर्यंत संघ आला आहे. मोदींनी शहांना पूर्ण मोकळेपणाने काम करण्यास संधी दिली आहे मात्र शहा स्थानिक व संबंधित नेत्यांना विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी संघाकडे आल्या आहेत.
दुसरीकडे, केंद्र सरकार व पक्षात मोदी-शहांची एककेंद्री सत्ता व वर्चस्व संघाला आता धोकादायक वाटू लागली आहे. वाजपेयी-आडवाणींच्या काळातही काही काळ असा प्रसंग ओढावला होता. त्यातून वेळीच बोध घेऊन संघ शहांना हटविण्याच्या तयारीत आहे. मोदींना पुढील काळात पूर्ण मोकळीक द्यायची तर दुसरीकडे पक्षसंघटनेत संघाच्या ऐकण्यातील पक्षाध्यक्ष ठेवायचा असा संघाचा विचार आहे. सरकार व पक्षसंघटनात दोन सत्ता केंद्रे ठेवल्यास वाद व संघर्ष घडल्याचा इतिहास आहे. हा वाद राहावा व दोन्ही सत्ताकेंद्रे नागपूरच्या चरणी लीन होतील असा कयास आहे.
पुढे वाचा, संघ निवडणार मोदींना आव्हान देऊ शकेल असा नवा अध्यक्ष...
...तर मोदी शहांना गुजरातमध्ये धाडतील