आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गाेंदिया’तील दगाबाजीने काँग्रेस- राष्ट्रवादीत दुरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून पावसाळी अधिवेशनातील पहिले तीन दिवस सत्ताधाऱ्यांना एकत्रित घेरणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अखेर चौथ्या दिवशी गुरुवारी मात्र फूट पडली. त्यासाठी कारण ठरले गाेंदिया जिल्हा परिषदेतील राजकारणाचे. गुरुवारी सकाळच्या सत्रात एकटी काँग्रेस पायऱ्यांवर अांदाेलन करत बसली, तर राष्ट्रवादीचे अामदार सभागृहात जाऊन कामकाजात सहभागी झालेले दिसले. अखेर, दुपारी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेऊन सदनाच्या आतच राहून सरकावर कर्जमाफीसाठी दबाव आणण्याचा निर्णय घेण्यात अाला.
गाेंदिया जिल्हा परिषदेत पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीला डावलून भाजपची मदत घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेसच्या या भूमिकेचे थेट मुंबईत पडसाद उमटले. तीन दिवसांची साथ साेडून राष्ट्रवादीने गुरुवारी सरळ सरकारविराेधी अांदाेलनात काँग्रेसचे साथ साेडून विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसचे अामदार अांदाेलनात एकाकी पडल्याचे दिसून अाले. विराेधी पक्षांमधील ही फूट सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावरच पडली. मात्र, उशिरा का हाेईना हा प्रकार लक्षात अाल्याने काँग्रेसने या वादातून मार्ग काढण्यासाठी तातडीने राष्ट्रवादीसाेबत बैठक बोलावली.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तसेच महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. गोंदियात भाजपशी हातमिळवणी करण्याच्या तेथील स्थानिक काँग्रेस आमदार गोपाळदास अग्रवाल यांच्या निर्णयामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज आहे. आमदारांवर काय कारवाई करावी, याचा निर्णय दिल्लीवरून घेतला जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कदाचित सोमवारपर्यंत अग्रवालांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता अाहे.

काँग्रेस साेडणार भाजपची साथ
गाेंदियात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपशी केलेली हातमिळवणीची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी गंभीरपणे दखल घेतली अाहे. याप्रकरणी गोंदियाचे आमदार गोपाळदास अग्रवाल यांच्यावर कारवाई तर करण्यात येईलच, पण तातडीने भाजपसोबतची युती ताेडण्याचा निर्णय घेतला अाहे. अशोक चव्हाण व मोहन प्रकाश यांना दिल्लीवरून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाकडून व्हीप बजावला गेला असतानाही काँग्रेसने भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अग्रवाल यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेतला असून त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना विचारले नव्हते. तयामुळे अग्रवाल यांच्यावर कारवाई तर होईलच, पण भाजपला मदत करणाऱ्या काँग्रेस सदस्यांवरही कारवाई होऊ शकते’, असे प्रकाश यांनी सांिगतले.

काँग्रेस-भाजप युती राहुल गांधींना नको!
गोंिदय जिल्हा परिषदेत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पटलेला नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तातडीने मोहन प्रकाश यांना महाराष्ट्रात पाठवताना कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस-भाजप युती होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना िदल्या. पक्षश्रेष्ठींच्या या सूचना मोहन प्रकाश यांनी बैठकीत बोलून दाखवल्या. शेवटी अशोक चव्हाण यांनी गाेंदियातील निर्णय स्थानिक पातळीवरचा हाेता, असे सांगत काँग्रेस कदापिही भाजपबरोबर जाणार नसल्याचे सांिगतले.

राष्ट्रवादीची दुतोंडी भूमिका : पटोले
खासदार नाना पटोले यांनी आमदार अग्रवाल यांना सोबतीला घेऊन राष्ट्रवादीला दणका िदला. काँग्रेसने राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी भावना िनर्माण झाली आहे.‘राष्ट्रवादीने काँग्रेसचा हात सोडून पुणे महापालिकेत भाजपबरोबर युती केली होती. त्या वेळी त्यांचा राज्यधर्म कुठे गेला होता? राजकीय गणिते जुळवताना अशा युती होतातच. त्यामुळे काँग्रेसने आता भाजपबरोबर युती करू नये, अशी राष्ट्रवादीची भू्मिका ही दुतोंडी आहे’, असे पटाेले यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...