आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून भेटवस्तू बनणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गणेशाेत्सवाच्या काळात बाप्पांना वाहिलेल्या दूर्वा, हार, फुले, बेलपत्र, फळे अादींचे िनर्माल्य गणेशमूर्तीचे विसर्जन करताना नदीत टाकल्यामुळे जलप्रदूषण तर हाेतेच, तसेच याच नदीत सांडपाणी साेडले जात असल्याने िनर्माल्याचे पावित्र्यही नष्ट हाेते. यावर उपाय म्हणून अाता अनेक िठकाणी निर्माल्य गाेळा केले जाते, त्यापासून खत तयार करण्याचे उपक्रम सेवाभावी मंडळांनी हाती घेतले अाहेत. पण मुंबईतल्या गणेश गल्ली मंडळाने या निर्माल्यापासून छानशी भेटवस्तू तयार करण्याचा अनाेखा उपक्रम सुरू केला अाहे.

अनेक भाविक दूर्वांची जुडी, एखादे फूल बाप्पाचा प्रसाद म्हणून पाकिटात ठेवतात िकंवा घरी घेऊन जातात. पण दाेन िदवसांनी सुकून गेल्यामुळे त्यांचे िनर्माल्य हाेते. या फुलांचे िनर्माल्य हाेता िकमान वर्षभर तरी ते भाविकांजवळ कसे राहू शकेल असा विचार मकरंद पाटील यांनी केला. गाैरव बाेरा अाणि गाैरव पाटील तरुणांच्या संकल्पनेतून फुलांवर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून त्यापासून भेटवस्तू तयार करण्याची संकल्पना त्यांना सुचली. जवळपास सहा महिने प्रयत्न केल्यानंतर या संकल्पनेला मूर्त स्वरूप अाले.

बाप्पाला फुले अर्पण केलेल्या ताज्या फुलांवरच विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली जाते. सर्वप्रथम एका यंत्राने या फुलातील अाेलावा काढून ती शुष्क केली जातात. या पद्धतीमध्ये फुलांमधील रंग थाेडाफार बदलताे. ही शुष्क फुले एका विघटनक्षम प्लास्टिकच्या िपशवीत ठेवली जातात. व्हॅक्युम अाणि सीलिंग मशीनच्या मदतीने ही फुले पॅकबंद केली जातात. िकमान एक वर्षतरी ही फुले िटकतात.

अाध्यात्मिक सेवा पुरविणारे मकरंद पाटील या उपक्रमाबद्दल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्पिरिच्युअल इंिडया माेहिमेत सहभागी झाल्यानंतर स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी हाेण्यासाठी काय करता येईल असा विचार मनात हाेता. गणेशाेत्सवाच्या काळात एकट्या मुंबईत जवळपास ५०० मेट्रिक टन िनर्माल्य जमा हाेते. या िनर्माल्यापासून खत करण्यासाठी महापालिकांना माेठ्या प्रमाणावर खर्च येताे. त्यामुळे िनर्माल्यापासून खत करण्याएेवजी या िनर्माल्यापासून भेटवस्तू तयार करण्यात येतात.

राज्यातल्या मंिदरांमध्ये लवकरच
गणेश गल्लीच्या गणेशाेत्सवात हा उपक्रम प्रायाेगिक तत्त्वावर राबविण्यात येत अाहे. परंतु लवकरच महाराष्ट्रातील अन्य मंिदरांमध्येदेखील हा उपक्रम राबवण्याचा िवचार अाहे. महापालिकांनी पुढाकार घेतल्यास त्यांच्या मदतीनेदेखील हा उपक्रम राबवता येऊ शकेल. महाराष्ट्रातल्या देवळांमध्ये हा प्रयाेग यशस्वी झाल्यास पहिल्या वर्षात िकमान दहा टक्के िनर्माल्यावर प्रक्रिया करता येऊ शकेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

अाकर्षक गृहोपयाेगी वस्तू
बाप्पांना वाहिलेल्या फुलांपासून वाॅल हँगिंग, कार हँगिंग, िकचेन, फाेटाेफ्रेमसारख्या गृहोपयाेगी वस्तू तयार केल्या जातात. तुमचा अावडता बाप्पा अाणि त्याच्या बाजूला तुम्ही वाहिलेले फूल अशी फ्रेम तुम्हाला ताबडताेब तयार करून िमळते. भेटवस्तू म्हणूनही हा पर्याय चांगला असून गणेश गल्ली गणेशाेत्सवात स्टाॅल उभारून या वस्तूंची विक्री करण्यात येणार अाहे. प्लास्टिकच्या िपशवीसह त्यातील फुलांचे कुंडीतल्या मातीत विघटन हाेत असल्यामुळे या भेटवस्तू पर्यावरणानुकूल असल्याचेही पाटील यांनी सांिगतले.
बातम्या आणखी आहेत...