मुंबई- 'गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया!'चा जयघोष... आसमंतात ढोल-ताशांचा घुमणारा आवाज...गुलालची उधळण...अशा उत्साहात मुंबईसह देशभरात आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पहाटेच सिद्धीविनायकची प्राणप्रतिष्ठा...
मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेश गल्लीचा राजा आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या सिद्धीविनायकची प्राणप्रतिष्ठा पहाटेच करण्यात आली. बाप्पांची पहिली आरतीही संपन्न झाली. वाद्यांचा बादशाह असलेला शिवमणी याच्या ताल-वाद्यांची सिद्धीविनायकाच्या आरतीला साथ लाभली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... मुंबईतील प्रसिद्ध गणपतींची रुपे...