आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Seva Mandal Of Mumbai Built A Insurance Of 260 Carore

मुंबईतील या गणेश मंडळाने काढला 260 कोटींचा विमा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जीएसबी गणेश मंडळाच्या मूर्तीचे संग्रहित छायाचित्र)
मुंबई- 29 ऑगस्टला सर्वत्र गणरायांचे आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी पुणे-मुंबईसह सर्व महाराष्ट्रभर गणेश मंडळांनी तयारी सुरु झाली आहे. बहुतेक मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. असे असले तरी मुंबईतील एक गणेश मंडळ यंदा वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. मुंबईतील सगळ्यात जुने व श्रीमंत गणेश मंडळ असलेल्या जीएसबी सेवा मंडळाने आपल्या गणेश मंडळाचा 260 कोटी रूपयांचा विमा काढला आहे.

मुंबईतील किंग सर्किल स्थित या सेवा मंडळाने यंदा पाच दिवसासाठी 259 कोटी रूपयांचा विमा उतरवला आहे. ज्यात सभामंडप, गणपतीची मूर्ती तसेच गणेश मंडळाच्या सदस्यांसह काही भक्तांचा विमा काढला आहे. एका सरकारी विमा कंपनीने हा विमा काढला आहे. आजपर्यंत कोणत्याही गणपती मंडळाने एवढ्या मोठ्या रक्कमेचा विमा काढलेला नव्हता हे विशेष. आतापर्यंत सर्वात जास्त विम्म्याची रक्कम लालबाग राजा मंडळाची होती. ज्याची रक्कम एकून 52 कोटी रूपये एवढी होती.

जीएसबी सेवा गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीवर सोन्याचे दागिने चढविण्यात आले आहेत ज्याची किंमत 22 कोटी रूपये आहे. पूजा व आरती समारंभानंतर या मूर्तीला एका लॉकरमध्ये बंद करण्यात येते.

जीएसबी सेवा मंडळाने वरिष्ठ ट्रस्टी सतीश नाईक यांच्या म्हणण्यानुसार, आमच्या मंडळाने एवढ्या मोठ्या रक्कमेचे टेंडर काढले होते. मात्र, ते केवळ सरकारी विमा कंपनीसाठीच काढले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विम्म्याची प्रीमियम रक्कम 50 लाख रूपये इतकी आहे. या विम्म्यात दहशतवादी हल्ला किंवा आगीसारख्या घटनांचा समावेश आहे.