आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या घरी प्राणप्रतिष्ठा; वाचा पूजन विधी, शुभ मुहूर्त, मंत्रांचा उच्चार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी आज (सोमवार) मोठ्या उत्साहात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पत्नी सत्‍वशीला चव्हाण यांच्यासह त्यांनी गणरायाची विधीवत पूजा केली. या घरगुती समारंभाला काही वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील कर्मचारी उपस्थित होते.

पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आणि देश-विदेशातही आज (सोमवार) गणरायाची पारंपरिक पद्धतीने मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. ढोल-ताशांच्या निनादात जागोजागी मिरवणूका काढल्या जात आहेत. त्याला गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गणपतीच्या स्वागतासाठी रस्त्यांवर रांगोळ्या रेखाटल्या जात असून गुलाल उधळून वातावारण निर्मिती केली जात आहे. आज घराघरांमध्ये येणारा गणराय आपल्या घरी 10 दिवस मुक्कामाला असणार आहे. याची तयारी कालच पूर्ण करण्यात आली असून आज त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

पुढे वाचा विधी, मुहूर्त आणि दुर्गा वाहताना म्हणायचे मंत्र....क्लिक करा पुढील स्लाईडवर...