आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्याच्या \'वर्षा\' बंगल्यावर बाप्पाचे आगमन, टाळ वाजवत मिरवणुकीत थिरकले शिक्षणमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया!' असा जयघोष...ढोल-ताशांचा घुमणारा आवाज...गुलालाची उधळण...अशा भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

'वर्षा'मध्ये बाप्पा विराजमान...
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान 'वर्षा'वर गणराजाची प्रतिष्ठापना झाली आहे. 
- बाप्पाच्या आगमनाने ‘वर्षा’वर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- मुख्यमंत्र्यांसह पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या कन्येने गजराजाची पहिली आरती केली.

दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकगा मुंडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्‍यात आली आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...  टाळ वाजवत मिरवणुकीत थिरकले शिक्षणमंत्री
बातम्या आणखी आहेत...