आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या अल्पवयीन मुलीवर खोपोलीत सामूहिक बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोपोली - मुंबईपाठोपाठ कोकणातील खोपोली येथेही अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. वडिलांसोबत भांडण झाल्याने पीडित मुलगी पुण्यातील घर सोडून आली होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन 5 नराधमांनी सलग पाच दिवस तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पुणे येथील एक मुलगी वडिलांशी भांडण झाल्याने घर सोडून खोपोलीत आली होती. रेल्वे स्थानकात काही तरुणांनी तिला सहानुभूती दाखवली व नंतर अत्याचार केले. शहरातील चंद्रविलास लॉजमध्ये बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर मुलगी घरी पोहोचली व तिने हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली.