आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत वृत्तछायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एका इंग्रजी मासिकाच्या छायाचित्रकार तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना वरळीतील शक्ती मिलच्या आवारात गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पीडितेवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणी पाचही आरोपींना अटक केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बातमीसाठीची छायाचित्रे काढण्यासाठी 22 वर्षीय वृत्तछायाचित्रकार पुरुष सहका-यासोबत मिलच्या परिसरात गेली होती. तिच्या सहका-याला बांधून पाच नराधमांनी मिलमधील ओसाड जागी तिच्यावर अत्याचार केले. त्याच वेळी ना. म. जोशी मार्ग पोलिसांना घटनेची माहिती फोनद्वारे कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. परंतु तोवर नराधम पसार झाले होते.

संशयितांचे स्केच बघा पुढील स्लाईड्समध्ये....