आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर सहा जणांचा बलात्कार; भिवंडीतील धक्कादायक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एका अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना भिवंडीत शुक्रवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीची फेसबुकवरील मैत्रीण शैलेदाबानो ऊर्फ सानिया निशाद अहमद शेख, अशफाक शेख आणि इर्शाद अन्सारीला अटक करण्यात आली आहे, तर चार आरोपी फरार झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची सानियाशी फेसबुकवरून ओळख झाली. याचा फायदा तिने मुलीला मुंबईत फिरण्यासाठी बोलावले. त्यानंतर सानियाने मुलीची सहा जणांशी ओळख करून दिली. त्यानंतर आरोपींनी मुलीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. घटनेनंतर मुलीने थेट पोलिस ठाणे गाठत सानियासह सहा जणांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन आरोपींना अटक केली, तर तीन आरोपींचा अद्याप शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...